Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मंत्रालयात येणाऱ्या जनतेसाठी वेळ राखून ठेवा ! ; मुख्य सचिवांचे निर्देश

मुंबई| प्रतिनिधी 

मुख्य संपादक :समाधान जगताप

मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन मुख्य सचिवांनी (Chief Secretary) मंत्रालयात आपल्या न्याय हक्कासाठी येणाऱ्या जनतेसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ४ ही वेळ राखून ठेवावी. या कालावधीमध्ये कोणत्याही बैठकांचे आयोजन करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manu Kumar Srivastava) यांनी मंगळवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून नागरीक मंत्रालयात येत असतात. मात्र, त्यांना भेट मिळतेच असे नाही. त्यामुळे पूर्वपरवानगीने किंवा पूर्वपरवानगीशिवाय भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचे कामकाजाचे स्वरूप विचारात घेऊन मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी (Ministerial officers) जनतेच्या भेटीसाठी दुपारी ३ ते ४ ही वेळ राखून ठेवावी, अशी सूचना केली आहे. क्षेत्रीय पातळीवर शासकिय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून ठराविक वेळ राखून ठेवावी. ही वेळ दुपारनंतर ठेवावी, असेही निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. दौरे, भेटी यामुळे जर क्षेत्रीय अधिकाऱ्यास कार्यालयात उपस्थित रहाणे शक्य नसेल तर अशा प्रसंगी जनतेच्या भेटीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभ्यागतांसाठी मध्यवर्ती नोंदवही ठेवावी. तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीचे दिवस आणि वेळ निश्चित करुन कार्यालयाबाहेर फलकावर तशी सूचना लावावी. अभ्यागतांनासाठी पासेसची सोय करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.