देवळा | वार्ताहर
देवळा तालुक्यातील (Deola Taluka) उमराणे दहिवड रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या शेतातून चंदनाची चोरी ( Theft of Sandalwood) करत असताना वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी चार किलो चंदनासह अज्ञात इसमांची दुचाकी जप्त (Seized) केली आहे... याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि. २९) रोजी देवळा तालुक्यातील उमराणे (Umrane) दहिवड रस्त्यावरील केशव देवराम देवरे यांच्या शेताजवळ काही अज्ञात इसम चंदनाची चोरी करत असल्याची खबर उमराणे वनक्षेत्र अधिकारी एम. एम. साळुंखे यांना मिळाली होती. त्यानुसार साळुंखे हे त्यांच्या सहकारी वनसेवकांसह सापळा रचत घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांना त्याठिकाणाहून ३ इसम दुचाकीवरून (Bike) येताना दिसले. त्यानंतर वनाधिकारी साळुंखे यांना पाहताच दोन जण पळून गेले. तर एक जण झटापट करून आम्ही चंदनाचे झाडे विकत घेतली असल्याचे सांगून चार किलो चंदन आणि सीबी शाईन दुचाकी क्रमांक (एम.एच. ४१ ए.एक्स ४५१५) व एका पिशवीत चंदन चोरीसाठी लागणारे साहित्य सोडून पळाला . त्यानंतर वनक्षेत्र अधिकारी साळुंखे यांनी सदर इसम हे अज्ञात असल्याचे सांगून जप्त केलेले साहित्य, चंदन व दुचाकी देवळा वनपरिक्षेत्र कार्यालयात (Deola Forest Range Office) जमा केली. तसेच सदर घटनेबाबत देवळा पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्य संपादक
समाधान जगताप