गहू, हरभरा पिकाचे नुकसान
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण
नाशिक तेल्हारा तालुक्यातील ग्राम दानापूर येथे वातावरणातील सतत होत असलेल्या बदला मुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शेतात असलेले पिकं घरात येतात की नाही या चिंतेत शेतकरी सापडला आहे.
गेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा सोंगणीची लगबग सुरु केली आहे. मात्र वातावरणात बदल झाल्याने आणि वाढत्या मजुरीच्या दराने शेतकरी हैराण झाला आहे.
तसेच हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून नेतो की काय, अशी चिंता गहू, हरभरा, कांदा,बिजवाई कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना लागली आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ग्राम दानापूर परिसरात गतवर्षी पेक्षा गहू,कांदा हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पहिले धुवारी, वातावरण खराब हवामान यामुळे हरभरा कांदा या पिकला फटका बसला त्यातून जे काही शेतकऱ्यांनी फवारणीची पिकावर मेहनत घेऊन वाचवले ते आता या अवकाळी पावसामुळे हाता, तोंडाशी आलेला घास जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकरी फार चितेत सापडला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याचे पिकावर मध्यंतरी व्हायरस आल्यामुळे उत्पादनही कमी झाले आहे. व त्यात बाजारात कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल दर पाहता शेतकरी राजा कर्जात बुडत असल्याचे चित्र दिसत आहे.कांद्याला बाजार पेठेमध्ये योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे शेतकरी वर्गामध्ये शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.उत्पादन खर्च वसूल करने कठीण होत असल्याचे दिसून येत आहे.
अवकाळी पावसामुळे
गहू, हरभरा पिकांचे नुकसान होताना दिसत असताना हरभरा सोंगणीसाठी मजूर मिळेनासा झाला आहे.म्हणून दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.