Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती मिरवणुक ढोल-ताशांच्या जल्लोषात साजरी, निबायती शेवाळे नगर

 प्रतिनिधी|मालेगाव


मुख्य संपादक:- समाधान जगताप 

नाशिक जिल्ह्यातील निबायती शेवाळे नगर येथे भारतरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सर्व धर्म एकञ येवून ढोल ताशांच्या तालावर ताल धरुन जल्लोष साजरा केला. 

 या प्रसंगी जयंती समिति चे अध्यक्ष काशीनाथ जगताप यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निबायती शेवाळे नगर गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक भालचंद्र जगताप यांच्या घरा पासून सुरवात झाली 11:30 दरम्यान मिरवणुक रथ शेवाळे नगर येतील बौद्ध विहारात पोचला असताना अध्यक्ष काशीनाथ जगताप यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कुठला ही अनुचित प्रकार न घडता सर्व धर्म समभाव राखत सर्वांनी एकञ येवून जयंती साजरी केली अध्यक्ष जगताप यांनी खुपच प्रमाणिक प्रयत्न करत सर्व कार्यक्रम पार पाडला. सामाजिक कार्यकर्ते श्री. समाधान बी जगताप यांनी काशीनाथ जगताप यांचे आभार व्यक्त केले. या वेळी जितेंद्र जगताप, संतोष जगताप, आणिल जगताप, भालचंद्र जगताप, आणिल आहिरे, साहेबराव पटाईत, गणेश उशिरे, राऊल भगवान जगताप, मंगेश जगताप, वाल्मीकि शेवाळे, किरण शेवाळे, अभिमन्यु योशोद, गोविंद शेवाळे, विश्वास बी जगताप, प्रमोद शेवाळे, विक्की ठाकरे, संजन ठाकरे, मा. उपसरपंच विनायक शेवाळे मा. उपसरपंच शिवाजी शेवाळे, व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन आपले विचार व्यक्त केले. सूञसंचालन संतोष जगताप यांनी केले. 

अध्यक्ष काशीनाथ जगताप यांनी तालुका पोलिस स्टेशन व सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.