नाशिक | सटाणा
सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) लखमापूर (Lakhmapur) येथे उकळत्या तेलाच्या कढईत (Cauldron) पडून सहा वर्षीय चिमुकलीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णवी पवार असे मृत्यू (Death) झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती आपल्या कुटुंबासमवेत लखमापूर येथे राहत होती. तिचे वडील समाधान निंबा पवार यांचा खाद्य पदार्थांचा व्यवसाय असून ते आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते. यावेळी मोठ्या कढईत शेव काढण्याचे काम (work) सुरू होते. काम संपल्यावर त्यांनी उकळत्या तेलाची कढाई खाली उतरून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या कामात ते व्यस्त होते. त्यावेळी या चिमुकलीचा (Girl) खेळता खेळता तोल गेल्याने ती जवळच असलेल्या उकळत्या तेलाच्या कढईत पडली. मुलगी कढईत पडल्याचे लक्षात येताच समाधान यांनी तात्काळ तिला कढईतून बाहेर काढत लखमापूर येथील रुग्णालयात दाखल केले. यावेळी लखमापूर रुग्णालयात (Lakhmapur Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर तिला आडगाव येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात (Satana Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा असा करुण अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.