सुरगाणा |प्रतिनिधी| Surgana
सध्या उन्हाळा आहे की, पावसाळा (rainy season) अशी निसर्गाची (nature) गोंधळलेली परिस्थिती झाली आहे. याच वातावरणीय अवस्थेत सुरगाणा तालुक्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते.
सोमवारी (दि.10) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुरगाणा, उंबरठाण, मनखेड, माणी, खोकरी, जांभुळपाडा, जाहुले, बोरगाव, मोहपाडा, सराड भागात वादळी वारा व विजेच्या कडकडासह जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाने आपला कहर दाखवला.यामध्ये माणी (ता.सुरगाणा)येथील मीरा धूम यांचे राहते घराचे पत्रे वादळी वा-यामुळे (wind) उडाल्याने मोठे नुकसान झाले. माणी येथीलच किसन चौधरी, गोटीराम पवार, प्रभाकर महाले यांच्या घराचे कौले उडाली आहे.शेतकऱ्यांनी (Farmers) शेतामध्ये कापून ठेवलेला गहू (wheat) व जनावरांना साठवून ठेवलेल्या चारा झाकण्यासाठी लगबग सुरू होती मात्र तेही पाण्यात सापडले. या पावसामुळे तालुक्यात आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी तालुक्यातील रामदास महाले, जयराम महाले, नारायण जाधव, ताराचंद जाधव, वसंत पवार, किसन चौधरी या आंबा उत्पाकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच माणी येथे तीन विद्युत (electricity) पोल पडल्याने सध्या स्थितीत वीज गायब झाली आहे; तर दुसरीकडे तालुक्यातील खोकरी येथील शेतकरी कुसुम धूम, विश्वास धुळे, काशिनाथ धुळे, युवराज धूम, लक्ष्मण गवळी यांच्या घरावरील पत्रे व कौले गेल्याचे समजत आहे.