Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बस-ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू; २२ जखमी

 पुणे |प्रतिनिधी

पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ (Navale Bridge) स्वामी नारायण मंदिर येथे आज मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा (Travels Bus and truck Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात ४ जणांचा मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत...याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर महामार्गावरून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन एक ट्रॅव्हल बस जात होती. त्याच दरम्यान साखरेची वाहतूक करणार्‍या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हल बसला जोरात धडक दिली. या धडकेत बस आणि ट्रक पलटी झाली असून या घटनेमध्ये २२ जण जखमी झाले आहेत, तर चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी रेस्क्यू टीम दाखल झाल्या व बचावकार्य सुरू केले. तसेच या अपघातात (Pune Accident) जखमी अवस्थेत असलेल्या एकूण १८ प्रवाशांना पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.