मालेगांव : S-NEWS मराठी महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड . A.S.J. मिडिया नेटवर्क :
मुख्य संपादक- समाधान जगताप:
मालेगाव इलेक्शन स्पेशल इफेक्ट्स : नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांनी प्रचारात स्वतःस झोकून देऊन अत्यंत प्रतिष्ठेची करून टाकली होती.अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे असा अत्यंत गंभीर सामना रंगला होता आणि ह्याच गंभीर सामन्यात अगदी होमपीच वरतीच मंत्री दादा भुसे यांच्या प्रतिष्ठेला धक्काच बसला इतका डिपॉझिट जप्त होण्या पर्यंतची मजल गेली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
_______________________________
समाधान जगताप: मुख्य संपादक :
संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क. करा.मो.9604000977
________________________________
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले बंदरे व खनिकर्म खात्याची धुरा हाती घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले ना.दादा भुसे यांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनल तयार करून प्रचारा साठी तहान भूक विसरून नको ते प्रयत्न करीत स्वतःस झोकून देऊन हि निवडणूक प्रतिष्ठेची करून टाकली होती आणि मीच जिंकणार अशा आविर्भावात फिरत सर्व उमेदवार त्यांच्या बळावर रुबाब दाखवत छाती फुगवत सत्ता आमच्याच हातात आहे समजत चक्क हिरेना व त्यांच्या उमेदवारांना धमकावत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून टाकली होती. त्यामुळे ह्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते.कारण शेवटी प्रतिष्ठेचा प्रश्न होताच.आणि झाले फासे उलटे पडले अगदी स्वतःच्या गावी होमपीच वरतीच दादा भुसेंची प्रतिमा मलिन तर झालीच पण त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा जबरदस्त धक्का ईच्छा नसतानाही खावा लागला. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दादा भूसेंच्या पॅनलचा धुव्वा उडाला मतदारांनी अगदी त्यांचा सुफडा साफ करून धोबी पछाड केले आणि संपूर्ण पणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपनेते अद्वय हिरे यांचे सह त्यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल ने निर्विवाद बहुमत प्राप्त करून बाजी मारली.म्हणून जनतेचा आवाज सांगतो की होमपीच वरती आपण आपले कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही तर मग आपली जबाबदारी आहे की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्यास नक्कीच भलाई राहणार.त्यामुळे याचा विचार नक्कीच कराल अशी आशा मालेगावातील मतदार जनता बाळगून आहे.येणारी विधान सभा निवडणूक असो ,लोकसभा निवडणूक असो जर बॅलेट पेपर वरती झाल्यास पूर्वी प्रमाणे शिक्का मारून जसे अमेरिकेत आजही ही प्रथा लागू आहे त्याप्रमाणे .निवडणूक होणे गरजेचे आहेच.जर बॅलेट पेपर महाराष्ट्रात,भारतात वापरला गेल्यास नक्कीच खरी निवडणूक झाल्यासारखे वाटेल.हुकूमशाही सारखे प्रमाण नष्ट झाले असे मतदारांना वाटणार.
महाराष्ट्रात नेतृत्व करणारा नेता होमपीच वरती आपले नेतृत्वाची चमक दाखवू शकत नाही याचा विचार होणे गरजेचे आहे.मात्र जो खरा हिरा असतो तो अंधारात सुद्धा चमकतो तसा खरा ओरिजनल हिरा उद्धव ठाकरे यांना मिळाला आणि त्या खऱ्या हिऱ्याने आपली चमक दाखवला सुरुवात केलीच हे सुद्धा भुसे यांनी मान्य करायला हवे.यासाठी मालेगाव महानगरातील जनतेचे खरे कैवारी बंडूकाका बच्छाव , सूनिलआबा गायकवाड,मदनबापू गायकवाड,डॉ.तुषारदादा शेवाळे,रामभाऊ मिस्त्री यांचेसह अनेक पदाधिकारी एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचा सामना करण्यासाठी गद्दारी न करता सदैव प्रामाणिक पणाने तयार राहून नागरिकांना न्याय देतात.मग कुठलीही निवडणूक असो जनता ह्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी असतात.मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वरील पदाधिकारी एकत्र येऊन डॉ.अद्वय हिरे यांच्या पॅनल साठी मेहनत घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल निवडून आणले. ते खालील प्रमाणे .
निवडलेले उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते
सोसायटी गटाचे विजयी उमेदवार
१) हिरे अद्वय प्रशांत (९६३) ,२) चव्हाण विनोद गुलाबराव (९५१) , ३) इंगळे उज्जैन लिंबा (८७०) ,४) पवार संदीप अशोक ( ८१४) , ५) सूर्यवंशी सुभाष भिला (८०९) , ६) मोरे रवींद्र गोरख ( ८०२), ७) पवार राजेंद्र तुकाराम (८०१)
सोसायटी महिला राखीव गट.
८) देवरे मीनाक्षी अनिल (९७९), ९) बोरसे भारती विनोद (८८३) ,
सोसायटी वि.जा./ भ. ज.
१०) शिरोळे नंदलाल दशरथ ( ९२८)
ग्रामपंचायत सर्वसाधारण गट.
११) पगार रत्ना प्रवीण (६६५) ,१२) सूर्यवंशी रवींद्र काळू ( ६२०) ,
आर्थिक दुर्बल गट
१३) निकम रवींद्र भगवान ( ६४६)
एस सी / एस टी गट
१४) सोनजकर अरुणा संजय ( ६७९ )