सर्वात मोठी बातमी! राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच
मे १०, २०२३
0
नवी दिली | वृत्तसंस्था | New Delhi
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अकरा महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंड केल्यामुळे
राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपच्या (BJP) पाठिंब्याने सरकार स्थापन
केले...यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचले. या निकालावर
संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली असून
उद्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील
सत्तासंघर्षावर (Power Struggle) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तब्बल नऊ
महिने सुनावणी (Hearing) झाली. न्यायालयाने आपला निकाल (Result) राखून ठेवला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे
(Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह
(MLA) भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च
न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी ५ याचिका दाखल झाल्या. आता
सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? १६ आमदार अपात्र ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष
लागलेले आहे.