Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नाशिक कर्नाटकात कॉंग्रेसचा विजय; नाशकात कार्यकर्त्यांचा जल्लोष

 नाशिक | Nashik


मुख्य संपादक: समाधान जगताप

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून त्यात काँग्रेसने ऐतिहासिक (Congress) विजय मिळवत भाजप आणि जनता दल (धर्मनिपेक्षक) यांचा धुव्वा उडवला आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३६ जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे...तसेच भाजप ६५, जेडीएस १९ आणि इतरांना ०४ जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे (Election Results) कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.कर्नाटक येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याबद्दल नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक शहर काँग्रेस भवन येथे आणि शालीमार येथील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या हस्ते महागाईला विरोध म्हणून प्रतिकात्मक गॅस सिलेंडरची पुजा करून विजयाचा जल्लोष केला. तसेच ढोल-ताशांच्या गजरात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या नावाच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. तर काँंग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत कर्नाटकच्या अभूतपूर्व विजयाबद्दल अभिनंदन केले.याप्रसंगी बोलताना छाजेड म्हणाले की, २०२४ ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीत अशाच पद्धतीने जनता पराभव करेल. कर्नाटकच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे, कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांनी मनेागत व्यक्त केले.दरम्यान, याप्रसंगी ज्येष्ठ नेते सिराज कोकणी, माजी नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका आशा तडवी, शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, जिल्हा एन एस यु आयचे अध्यक्ष अल्तमश शेख, शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शहर अनुसूचित जमाती विभाग अध्यक्ष संतोष ठाकूर, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

काँग्रेस सेवादलातर्फे आनंदोत्सव

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने बहुमताने कर्नाटक राज्यामध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता मिळवली आहे.खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा विजय आहे, असे सांगत नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे उपाध्यक्ष उमेश चव्हाण, लहू जाधव, संतोष हिवाळे, सिराज खान, दीपक धवर, बाळासाहेब आहेर, राजेंद्र बनसोडे, संजय पवार यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.