नाशिक | प्रतिनिधी| Nashik
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी मोठी कारवाई करत जिल्हा उपनिबंधकांना 30 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीवर नुकतेच संचालक म्हणून निवडून आलेल्याकडून 30 लाख रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम आपल्या घरी स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे...सतिश भाऊराव खरे (वय 57 वर्ष. पद जिल्हा उपनिबंधक, सहकरी संस्था नाशिक वर्ग-1 रा. फ्लॅट नंबर 201, आई हाईट्स, कॉलेज रोड, नाशिक) व शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय 32 वर्षे धंदा वकील, खाजगी ईसम, रा . फ्लॅट नं 4, उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तक्रारदार हे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये संचालकपदी कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावरवर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी यातील जिल्हा उपनिबंधक व त्यांच्या एका खाजगी इसमाने यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस लाख रुपये लाचेची मागणी केली.ही रक्कम जिल्हा उपनिबंधक खरे यांनी स्वीकारण्याचे मान्य करून त्यांच्या घरी तक्रारदाराकडून तीस लाख रुपये रोख लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने केली आहे.