Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काय झालं मान्सूनचं? का उशीर होतोय त्याला ? नक्की कधी येणार तो? घ्या जाणून…!

नगर जिल्हा|वार्ताहर

मुख्य संपादक:समाधान जगताप. 

शेतकरी बांधवांसह तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यात पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण आकाशातून पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब पिकाच्या कोंबावर जेव्हा पडतो, तेव्हा त्या पिकासाठी ते अमृता समान असते. या पावसाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. मात्र तो सतत हुलकावण्या देत येत आहे. बिपोरजॉय या चक्रीवादळाचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करणारे पंजाबराव डख यांच्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. ते हवामानाचा किंबहुना पावसाचा अचूक अंदाज वर्तवितात. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये मान्सून नक्की कधी येणार ,त्याला उशीर का होतोय, याविषयी डख काय म्हणताहेत, ते आता आपण जाणून घेऊया…

चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आहे, असे पंजाबराव डख panjabrao Dakh यांनी सांगितले आहे. शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. 1 इंच ओल गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कारण 22 जून नंतर चांगला पाऊस पडणार आहे, असं ते सांगताहेत.डख यांचं म्हणणं असं आहे, की दि. 14 ते 20 जून दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. हा पाऊस फक्त अहमदनगर, नाशिक, पालघर, मुंबई, सातारा, सांगली, पुणे या भागांत 14 ते 20 जून दरम्यान पाऊस पडणार आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांना मनसूच्या आगमनासाठी दिनांक 22 जूनची वाट पहावी लागणार आहे.सध्या नगर जिल्ह्याच्या अनेक भागांत नुसताच सोसाट्याचा वारा सुरू आहे. काही जण म्हणतात की हा वारा नक्की पाऊस आणणार. परंतु सतत भर्र भर्र भर्र वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे विहिरी आणि बोरवेल मधल्या पाण्याची पातळी खालावत आहे.अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची प्रशासनावर वेळ आली आहे. जोरात वेगाने वाहणारा वारा, आकाशात ढगांचा एकमेकांना घर्षणामुळे होत असलेला आवाज आणि कडक ऊन यामुळे नैसर्गिक आपत्तीची भीती सर्वांच्याच मनात धडकी भरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.