सातारा | प्रतिनिधी
मुख्य संपादक:- समाधान जगताप.
सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमीपूजनावरून आमनेसामने आले होते. आता उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवेंद्रराजे भोसलेंसह ८१ जणांवर तर उदयनराजेंसह ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र उदयनराजेंच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विरोध करत तो उधळून लावण्यात आला. बाजार समितीच्या जागेवरून हा वाद आहे.खासदार उदयनराजे यांचे कुळ असणारे शेतकरी संपत जाधव यांनी बेकायदेशीर जमाव जमवून वहिवाट दाराच्या जागेत येऊन दमदाटी केल्या प्रकरणी 51 ओळखीचे आणि 25 ते 30 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.तर शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 45 जणांच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.