पुणे|प्रतिनिधी
प्रतिलिटर ३५ रुपयांपेक्षा कमी दर दुधाला,, , .(Milk Price) देता येणार नाही, असा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबत समिती नेमून तातडीने धोरण निश्चित होईल, प्रत्येक चार महीन्याने परिस्थितीचा आढावा घेऊन दरनिश्चिती होईल, भेसळयुक्त दुधाचा (Milk Adultration) कायमस्वरुपी प्रश्नी सोडवण्यासाठीप्रसंगी मोक्काअंतर्गत कारवाई करु, अशी महत्वपूर्ण घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परीषदेत केली.