मालेगांव. शेंदुर्णी
संपादकिय..
मुख्य संपादक: समाधान जगताप
दि.4/5/2023 रोजी श्री.अशोक जगन्नाथ शिंदे यांचा सेवापूर्ती सत्कार संमारभ कार्यक्रम शेंदुर्णी या मुळ गावी मोठ्या उत्साहात साजरा झाला अनेक राजकीय नेते,उप विभागीय अधिकारी वनपरिक्षेञ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. निबायती गावात सेवा बजावत असताना शिंदे साहेब हे सेवा निवृत झाले. मि निबायती गावाच्या वतीने उपस्थित होतो शिंदे साहेब यांच्या बद्दल माझ्या मनात सुध्दा मनोगत व्यक्त करण्याची इच्छा होती पण वेळे आभावि ते शक्य झाले नाही म्हणून आज मनमोकळं त्यांचे कौतुक करावे असे मला वाटले म्हणून लिहित आहे....
गेल्या तिन चार वर्षो पासून शिंदे साहेब निबायती गावाच्या वन विभागात कार्यरत होते गेल्या तिन चार वर्षात निबायती वन विभागला नंदन वन करण्यात शिंदे साहेब यांचा मोलाचा वाटा आहे.
प्रेमळ स्वभाव स्वच्छ चरित्र व कोणीही त्यांचा आदर्श घ्यावा अस व्यक्ति महत्व असा सक्षम अधिकारी निबायती गावात आला आणि वृक्ष तोड थांबवली, गोण खनिज माफिया यांच्या विरोधात कठोरता दाखवत निबायती गावाचे वन व गाव विकासनशील केले.
वन अधिकारी, कर्मचारी हा शेतकरी. कामगार.मेंढपाळ यांच्या जवळचा व्यक्ति म्हणून ग्रामीण भागात ओळखला जातो, हे सर्व शिंदे साहेब यांनी सिद्ध करुन दाखवले असे चांगले काम करताना त्यांच्या वर अनेक प्रकारे राजकीय दबाव आले पण ते कधीही दबावाला बळी न पडता आपले कार्य करत राहिले
युवा पिडीने त्यांचा आदर्श घ्यावा असे अनेक गुण त्यांच्यात आहेत खास करुन शेंदुर्णी गावाने त्यांचा आदर्श घ्यायला हवा, सत्य बोलने, दडपशाहीला बळी न पडने. रिश्वत खोरी पासून दुर राहने असे अनेक गुण त्यांच्या कडून घेण्या सारखे आहेत.
त्यांचे सह कर्मचारी दैतकार मँडम यांना नेहमीच सहकार्य करणारे शिंदे साहेब होते. दबंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख झाली होती तसेच त्यांच्या सह कर्मचारी दैतकार मँडम या सुध्दा त्यांच्या पायावर पाय ठेवत आज निबायती गावात सेवा देत आहेत. नविनच दैतकार मँडम यांची नियुक्ति निबायती गावात झाली असताना त्या वेळी एक महिला कर्मचारी आहे म्हणून वन विभागचे वाँचमन सह वाळू माफिया त्यांचा विरोध करत होते त्या वेळी शिंदे सारखे अधिकारी मँडम च्या बरोबर खंबिर पने उभे राहीले. आज दैतकार मँडम यांची ओळख सुध्दा दबंग म्हणून गावात झाली आहे वाळू माफिया यांचा गर्दन काळ म्हणून मँडम ला ओळखले जाते. हे सर्व अधिकारी प्रमाणिक कर्तव्य बजावत असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना साथ देत नाहीत याची खंत वाटते. माझ्या अनुभवानुसार मालेगांव वन विभागात RFO काबंळे साहेब. शिंदे साहेब व दैतकार मँडम कर्तव्य दक्ष अधिकारी कर्मचारी म्हणुन नावा रुपाला आले, तसेच
मालेगांव वन विभागात असे चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी अजून नावा रुपाला आलेले नाहीत तसे नाव ही मला आठवतं नाही, याची दखल वरिष्ठ अधिकारी यांनी घ्यायला हवी.
लिहण्या सारखं बरच काही आहे पण थांबतो..
काल निबायती गावाच्या वतिने समाधान जगताप(पञकार)
रामेश्वर सुर्यवंशी. अणिल जगताप है उपस्थित होते त्या निमित्ताने निबायती गावाच्या वतिने इलेक्ट्रिक मिडिया पत्रकार संघ व राजर्षि शाहू महाराज बहूउद्देशिय शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतिने शिंदे साहेब यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...