Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मालेगाव शहरात विर एकलव्य स्मारकासाठी समिती गठीत करावी..!!

मालेगाव |प्रतिनिधी

मुख्य संपादक- समाधान जगताप

मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आदिवासी समाज प्रचंड प्रमाणात असुन तालुक्यातील आदिवासी एकत्र नसल्यामुळेच आदिवासींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा आदिवासींचे मतदान हे निर्णायक ठरते.तसेच लोकसभा,विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत देखील आदिवासींचे मतदान किंगमेकर ठरते.परंतु आदिवासींमध्ये एकी नसल्यामुळे आजपर्यंत आदिवासींच्या मतांवर केवळ राजकीय पोळी भाजून राजकारण केले गेले.तालुक्यातील आदिवासींच्या हितासाठी कोणत्याच राजकीय नेत्यांकडून आवाज उठवला गेला नाही.हे आदिवासींचे दुर्दैव आहे.आमच्या मागील पिढ्या अशिक्षित,अज्ञान होत्या पण आजची आदिवासींची तरूण पिढी सुशिक्षित आणि जागृत झाली आहे.आमचे आदर्श भगवान विर एकलव्य,टंट्यामामा भील,खाज्या नाईक,राणा पुंजा भील,राघोजी भांगरे,बिरसा मुंडा,यांनी देशासाठी केलेले कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असुन आता आदिवासींचा खरा इतिहास जगासमोर येत आहे.असा सुर निळगव्हाण येथील बैठकीत तरूणांमधुन दिसुन आला.

मालेगाव तालुक्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असुन देखील मालेगाव शहरात आदिवासींचे दैवत भगवान विर एकलव्य यांचे स्मारक आजपर्यंत का झाले नाही.असा प्रश्न आदिवासी तरुण उपस्थित करत आहेत. मालेगाव शहरात सर्वच जाती धर्माच्या महापुरुषांचे स्मारक आहेत, पण तालुक्यातील एवढ्या प्रचंड जनसमुदायाचे आराध्य दैवत भगवान विर एकलव्य यांचे स्मारक नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.म्हणून हे स्मारक लवकर बनावे त्यासाठी तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना,संस्था,गृपचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक समिती स्थापन करावी व समिती मार्फत प्रत्येक गावातील आदिवासींना एकत्र करून मालेगाव शहरात भगवान विर एकलव्य यांचे स्मारक बनवण्यासाठी कायदेशीर संघर्ष करावा लागेल.अशी भावना कार्यकर्त्यांत दिसुन आली व तसे नियोजन लवकरच जाहीर करण्यात येईल असे या बैठकीत ठरविण्यात आले.तसेच या बैठकीस बागलाण तालुक्यातील प्रवीण भील यांनी भगवान विर एकलव्य स्मारक समितीची निर्मिती,नियोजन,कार्य याविषयी थोडक्यात माहीती दिली व हिरालाल भील यांनीदेखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले.यावेळी दिपक भील,अनिल भील यांनीदेखील उपस्थिती लावली.बैठकीचे सर्व नियोजन ज्ञानेश्वर भील,प्रकाश पवार,सयाजी दळवी,विजय अहिरे व त्यांच्या सहकार्यानी केले.या बैठकीस तालुक्यातील निळगव्हाण,काष्टी,अजंग,करंजगव्हाण,भायगाव,सवंदगाव,मालेगाव शहरातील आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.