Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISIS मध्ये भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला अटक

पुणे | Pune

मुख्य संपादक:- समाधान जगताप

NIA ने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. ISIS संघटनेच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या इसमाला एनआयएने अटक केली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरातून डॉक्टर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अदनाली सरकार असे या डॉक्टरचे नाव आहे...सरकार हा गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात राहत आहेत. या डॉक्टरकडे ISIS मध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी होती. डॉ. सरकार याच्या घरातून ISIS संदर्भात अनेक कागदपत्र सापडली असून काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस देखील सापडले आहेत.आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही त्याची मुख्य जबाबदारी असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. याप्रकरणी आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एकाला अटक केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.