Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

15 लाखांची लाच घेताना नाशिक जिल्ह्यातल्या तहसीलदाराला एसीबीने पकडलं रंगेहाथ…!

 नाशिक | प्रतिनिधी


मुख्य संपादक: समाधान जगताप

मुरूम उत्खननाच्या मूल्य नियमानुसार तक्रारदाराला पाचपट दंड आकारण्यात आला. स्वामित्व धन, जागा भाडे असा एक कोटी 25 लाख 6 हजार 220 दंड आकारण्यात आला. मात्र जमीन मालक असलेल्या तक्रारदारांना उपयोग उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील केलं होतं. परत दुसरी प्रकरण चौकशीसाठी तशील दाराकडे आला तहसीलदारांनी 15 लाखांच्या लाचेची मागणी केली. तिलाच घेताना तहसीलदाराला नाशिक एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलं.नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय् – ४४ वर्ष, धंदा – तहसीलदार नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असं लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे.राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालकयांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते.सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते.जमिनीच्या मालक हे वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते आरोपी लोकसेवक यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदारयांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

मागणी केलेल्या लाचेची रक्कम आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक), माधव रेड्डी (अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक), नरेंद्र पवार ( वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखालीसंदीप घुगे, (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), सह सापळा अधिकारी स्वप्नील राजपूत (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), पोलीस नाईक गणेश निबाळकर, पो. ना. प्रकाश महाजन,पो. शि. नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.