नाशिक | प्रतिनिधी
मुख्य संपादक-समाधान जगताप.इगतपूरी तालुक्यात भूमाफियांनी बळकावलेल्या जमिनी परत कराव्यात, तसेच नोटरी करुण आदिवासी जमिनी बळकावल्या जात आहेत याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी भूमाफिया बळकावत आहेत. जमीन मोजणीच्या नावाखाली आदिवासींना दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन तेथे खोटेनाटे सांगून कागदपत्रांवर सह्या व अंगठे घेण्याचे काम होत आहे.
(मालेगाव तालुक्यातिल आदिवासी जमिनी बळकावनारे भूमाफियां कोण? लवकरच सविस्तर वृत S-NEWS मराठी च्या माध्यमातून प्रसिध्द होणार..)
बँकेतही खाते उघडण्याच्या बहाण्याने घेऊन जाताना खातेदाराचे बँकखात्याचे पासबुक व चेकबुक हे भूमाफिया जबरदस्तीने स्वतःजवळ ठेवत आहेत. या सर्व प्रकारात आदिवासी बांधवांची हातची जमीन जात असून, त्यांना मोबदल्याचे पैसेही मिळत नाहीत.परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
तसेच मालेगाव तालुक्यात ही आदिवासी जमिनी मोठ्या प्रमाणात नोटरी करुन बळकावलेल्या आहेत या साऱ्या प्रकरणात नोटरी अधिकारी महसूल व बँके अधिकाऱ्यांचे भूमाफियांशी संगनमत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, संबंधित प्रकरणाच्या चौकशीसह त्यात सहभागी बँक अधिकारी व महसूल कमर्चाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच या सर्व प्रकारात आदिवासी खातेदार व कष्टकऱ्यांना सरकारी बाजारभावाचा मोबदला न देता भूमाफिया यांनी बळकावलेल्या जमिनी परत कराव्यात, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.याबाबत तातडीने न्याय न मिळाल्यास मुंबई येथे मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करणार असून, न्याय मिळेपर्यंत अन्यायग्रस्त आदिवासी मागे हटणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.