मुंबई | Mumbai
मुख्य संपादक: समाधान जगतापमहाराष्ट्रात यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही भागांत पुराचा फटका बसूनही शेतीचे नुकसान झाले आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणे, अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे...
मागील सात महिन्यात राज्यात १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.काँग्रेस नेते विजय विडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
अमरावती विभाग : ६३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती १८३
बुलढाणा १७३
यवतमाळ १४९
अकोला ९४
वाशीम ३८
औरंगाबाद विभाग : ५८४ शेतकरी आत्महत्या
बीड १५५
उस्मानाबाद (धाराशिव) १०२
नांदेड ९९
औरंगाबाद ८६
परभणी ५१
जालना ३६
लातूर ३५
हिंगोली २०
नाशिक विभाग : १७४ शेतकरी आत्महत्या
जळगाव ९३
अहमदनगर ४३
धुळे २८
नाशिक ०७
नंदुरबार ०३
नागपूर विभाग : १४४ शेतकरी आत्महत्या
चंद्रपूर ७३
वर्धा ५०
नागपूर १३
भंडारा ०५
गोंदिया ०३
पुणे विभाग : १६ शेतकरी आत्महत्या
सोलापूर १३
सातारा ०२
सांगली ०१
(पुणे आणि कोल्हापूर शून्य शेतकरी आत्महत्या)
कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही
महिन्यानुसार शेतकरी आत्महत्या
जानेवारी २२६
फेब्रुवारी १९२
मार्च २२६
एप्रिल २२५
मे २२४
जून २३३
जुलै २२९