मुंबई|प्रतिनिधी
मुख्य संपादक- समाधान जगतापराज्यात सध्या मराठा आरक्षणासाचा मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केले असून आज (३१ ऑक्टोबर) रोजी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. तसेच राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून कालपासून मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे...
"सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, आंदोलकांना त्रास देऊ नका नाहीतर"...; जरांगे पाटलांचा इशारा
शिंदे समितीच्या प्रथम अहवालावर शिक्कामोर्तब; राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' पाच मोठे निर्णय या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला. या समितीने मराठवाड्यातील (Marathwada) मराठा समाजाला कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यासाठी प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या समितीच्या अहवालाला मान्यता देण्यात आली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यावर आता मराठा आंदोलकमनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहेयावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, आज सरकारने (Government) घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही, तर मी जलत्याग करणार आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा. तसेच मराठ्यांच्या तरुणावर खोटे गुन्हे दाखल करु नका. महाराष्ट्र शांत आहे. सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी,जिल्हाधिकाऱ्यांसमोर जाऊन बसेन. त्यावेळी १० लाख किंवा ५ लाख मराठा समाज येईल हे सांगता येत नाही. मी बीडला आल्यास मराठा समाजाची ताकद समजेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.जरांगे पुढे म्हणाले की,
"आता आम्ही सहन करणार नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करु द्या. नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. सरकारला मला सांगायचंय बीडचा जो प्रकार सुरु आहे तो थांबवा. बीडमध्ये जातीयवादी अधिकारी आहेत. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसं उत्तर दिले जाईल. आंदोलन शांततेत सुरु आहे. त्यामुळे आम्हाला त्रास देऊ नका. बीडमध्ये जे सुरु आहे ते मागे घ्या. अगोदर आमचे आंदोलन आहे त्यानंतर तुमची संचारबंदी आहे. तुम्ही आम्हाला त्रास दिला तर पुढे काय होईल याची जबाबदारी तुमची आहे. अर्धवट प्रमाणपत्र चालणार नाहीत. सरसकट मराठ्यांना आरक्षण हवे आहे अशी भूमिकाही यावेळी जरांगे पाटील यांनी मांडली.ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्ही एकटे ५० टक्के आहोत. बौद्ध, मुस्लिम ,धनगर, ओबीसी यांचाही आम्हाला पाठिंबा आहे. दुसऱ्यांसाठी आमचे लेकरं उपाशी मारु नका. आरक्षण द्या अन्यथा उद्यापासून पाणी देखील घेणार नाही. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहील", असा इशाराही जरांगे यांनी दिला. तसेच यावेळी जरांगे पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, एका उपमुख्यमंत्र्यांना काड्या करायची सवय आहे, पण मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जशासतसे उत्तर दिले जाईल. तसेच सरकारला ताणायचे असेल तर आम्हीही दाखवूच,उद्यापासून साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि गावबंदी अशी त्रिसूत्री असणार आहे, असेही जरांगे पाटलांनी सांगितले.