मुंबई.
मुख्य संपादक- समाधान जगताप
आपण जर घरात बसलो तर आपल्या मुलांचे हाल होतील. त्यामुळे घरात बसू नका. मुंगी सारखं बाहेर पडा आणि मुंबईकडे चला, असं आवाहन मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं. दरम्यान, मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार, त्याविषयी जरांगे पाटील उद्या म्हणजे दिनांक 28 रोजी सांगणार आहेत.महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष सुरूच राहणार, असंदेखील जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले असताना आम्हाला क्युरेटिव्ह पिटीशनच्या फुफाट्यात का ढकलता, असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला.आमच्या हक्काचा आरक्षण आम्ही मागत आहोत हा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे कारण मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत. विखे पाटलांनी आमच्याबद्दल पाठीमागे बोलू नये आम्ही करत नाही तर ते करताहेत. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली का, असे त्यांना विचारा. 20 जानेवारीच्या आत जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर आम्हाला मुंबईला जायची काही हौस नाही, असंही जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलंय.