Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंडिया आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार – राहुल गांधींची मोठी घोषणा

 मुंबई| Mumbai

मुख्य संपादक: समाधान जगताप

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची अमरावती (Amravati) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर (Modi) टीका करत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांत देशातील बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही. त्यामुळे केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही लगेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. तसेच शेतकऱ्यांसाठी देशात एका कृषी आयोगाची स्थापना देखील केली जाईल. जेणेकरून कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची (Loan Waiver) शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असे त्यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले की, भाजप सरकारने (BJP Government) २० ते २५ लोकांना अब्जाधीश केले. मात्र आता आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल की इंडिया आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार, करोडो लोकांना लखपती कसे बनवणार? हेच मी आज तुम्हाला याठिकाणी सांगण्यासाठी आलो आहे. आमचे सरकार आल्यास सगळ्यात पहिले महिलांसाठी ‘काम महालक्ष्मी योजना’ आणणार असून यासाठी प्रत्येक गरीब कुटुंबाची यादी बनवली जाईल असं राहुल गांधींनी म्हटले.तसेच राहुल गांधींनी पुढे म्हटले की, देशात करोडो लोक दारिद्र्यरेषेच्या खाली राहत असून त्यांची देखील यादी आमचे सरकार आल्यास तयार केली जाईल. यात प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचे नाव निवडले जाईल. त्यानंतर या महिलेच्या बँक खात्यात आमचे (इंडिया आघाडी) सरकार प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये टाकणार, असे महिन्याला ८ हजार ५०० रुपये आणि वर्षांचे १ लाख रुपये करोडो महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.