Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निमगाव प्राथमिक मुख्य आरोग्य केंद्र कर्मचारी विना आजारी असल्याने, उपकेंद्रांची अवस्थाही बिकट..

मुख्य संपादक- समाधान बी.जगताप


मालेगाव|प्रतिनिधी|दादासाहेब पवार

 मालेगाव : निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला S-NEWS मराठी च्या टिम ने भेट दिली असता येथील वैद्यकिय अधिकारी व उपस्थित कर्मचारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या...

सविस्तर वृत्त-निमगाव आरोग्य केंद्राची अवस्था ही बिकट आहे रोज १३० ते १४० रुग्ण औषध उपचारासाठी येतात व स्री-शस्रक्रिया कैंपला येणारे सीझरचे पेशंट जास्त असल्याने येथे या दवाखान्यात सीझरचे ऑपरेशन करण्याकरिता मशीनरी साधन-सामग्री उपलब्ध नसल्याने येथे सीझरचे स्री-शस्रक्रिया केली जात नाही. निमगावसह पंधरा ते वीस खेड्यांचे रुग्ण येतात.

निमगाव, निंबायती, जाटपाडे, चौकटपाडे, मेहुणे, घोडेगाव, ज्वार्डी आदी भागातील रुग्ण येत असतात. मुख्यालयात राहण्यासाठी सुसज्ज इमारती बांधल्या आहेत, मात्र कर्मचारीच नसल्याने त्या ओस पडल्या आहेत. निमगाव प्रथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील लोकसंख्या ५० ते ६० हजार असल्याकारणाने मोठा दवाखाना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ बाय ७ चे असल्याने आयपीस अंतर्गत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साधन-सामुग्री,मशीनरी,ऑपरेशन करणारे सर्जन डॉक्टर, व्हेटिलेटर,औषधी साठा उपलब्ध करुन द्यावा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे आरोग्यसेविकेचे ७ पदे रिक्त असून २ पदे भरलेली आहेत, तसेत परिचरचे ४ पदे मंजूर असून फक्त १ स्री परिचर पद भरलेले आहे सर्व पदे रिक्त असुन औषधनिर्माण ,लैब-टेक्नीशियन ,आरोग्य सहाय्यीका,आरोग्य सहाय्यक मलेरिया,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व इतर पदे तात्काळ भरण्यात यावी 

तसेच निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामिण रुग्णालयाचा दर्जा देऊन कायमस्वरुपी वर्ग एकच्या अधिकार्याची पुर्ण वेळ नियुक्ती करावी. पुरेसे कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 बायोमेट्रिक मशीन, कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.

"पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य केंद्रात पूर्णवेळ रुग्णसेवा मिळत नाही. अनेक जण खासगी डॉक्टरकडे जातात. आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसतो. दुसऱ्या केंद्राचे कर्मचारी येऊन औषध गोळ्या वाटप करतात. साथीचे आजारांची कुठलीही जनजागृती होत नाही. कंत्राटी कर्मचारींचे वेतन अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने तेही नाममात्र काम करतात."

निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आज पर्यन्त झाली नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अनुभवी कर्मचारी नियुक्त करावेत. अशी मागणी S-NEWSमराठी च्या वतीने मंञी महोदय, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.